IND vs SL 3rd T20I: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज तिसरा टी-20 सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळवला जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताने पहिला सामना 43 धावांनी तर दुसरा सामना सात विकेटने जिंकला. आता श्रीलंकेचा क्लीन स्वीप करण्याकडे सूर्या ब्रिगेडची नजर असेल. त्याचबरोबर चारिथ असालंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ विजयासह मालिका संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, श्रीलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला सहावा धक्का लागला आहे. शुभमन गिल 37 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 102/6
3RD T20I. WICKET! 15.2: Shubman Gill 39(37) st Kusal Mendis b Wanindu Hasaranga, India 102/6 https://t.co/UYBWDRh1op #SLvIND #3rdT20I
— BCCI (@BCCI) July 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)