IND vs ENG 2nd Test Day 3: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. तत्पूर्वी, भारताने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करत 396 धावावर बाद झाला. भारताचा युवा स्टार यशस्वी जैस्वालने शानदार दुहेरी शतक झळकावले. तसेच इंग्लंडचा संघ दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 253 धावांत गारद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. आता ही आघाडी दुसऱ्या डावात 171 धावांची झाली आहे. जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय कुलदीप यादवने तीन विकेट घेतल्या. अक्षर पटेलला एक विकेट मिळाली. दरम्यान, तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदांजीला आलेल्या भारतीय संघातील स्टार शुभमन गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले आहे, भारताची धावसंख्या 200 धावांच्या पुढे गेली.
𝙃𝙐𝙉𝘿𝙍𝙀𝘿 𝙛𝙤𝙧 𝙎𝙝𝙪𝙗𝙢𝙖𝙣 𝙂𝙞𝙡𝙡! 💯
A glittering knock as he completes his 3rd Test Century 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/z33eaw2Pr5
— BCCI (@BCCI) February 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)