Shoaib Bashir New Record: भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडचा फिरकी गोलंदाज शोएब बशीरने (Shoaib Bashir) पाच बळी घेतले. एका डावात 5 बळी घेणारा तो इंग्लंडचा दुसरा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे. भारताचा पहिला डाव 307 धावांवर संपला आणि इंग्लंडने पहिल्या डावात 46 धावांची आघाडी घेतली. शोएब बशीरने शुबमन गिलच्या रूपाने डावातील पहिली विकेट घेतली, त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर त्याने रजत पाटीदार, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा यांच्या रूपाने महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. आकाश दीपच्या रूपात शोएब बशीरने डावातील शेवटची विकेट घेत त्याचे पाच बळी घेतले. (हे देखील वाचा: R Ashwin New Record: आर अश्विनचा भारतीय भूमीवर ऐतिहासिक पराक्रम, घरच्या मैदानावर ठरला नंबर-1 गोलंदांज)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)