पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नुकतीच टी-20 विश्वचषक 2022 साठी संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह (Shaheen Afridi) आफ्रिदीचेही या संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो आशिया चषक स्पर्धेचा भाग नव्हता. दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) शाहीन शाह आफ्रिदीबाबत वक्तव्य केले असून, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) काळे सत्य समोर आले आहे. एका टीव्ही शोमध्ये शाहीन शाह आफ्रिदीच्या दुखापतीवर बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला, 'शाहीन शाह आफ्रिदी त्याच्या तिकिटावर इंग्लंडला गेला होता. स्वखर्चाने इंग्लंडमध्ये राहिला, इथून मी डॉक्टरांची व्यवस्था केली आणि तिथेच त्यांनी स्वतः डॉक्टरांशी संपर्क साधला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्याच्या उपचारात काहीही केले नाही. शाहिद आफ्रिदीच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)