IND vs ENG 2nd Test Day 2: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील विशाखापट्टणम कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात बिनबाद 28 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल 15 आणि कर्णधार रोहित शर्मा 13 धावांवर नाबाद आहे. तत्पूर्वी, इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावांत गारद झाला होता. भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. आता ही आघाडी दुसऱ्या डावात 171 धावांची झाली आहे. जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय कुलदीप यादवने सहा विकेट घेतल्या. अक्षर पटेलला एक विकेट मिळाली. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. त्याच्याशिवाय इंग्लंडकडून इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. 47 धावा करणारा बेन स्टोक्स संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.
Stumps on Day 2 in Vizag! 🏟️
A fabulous day with the bat & ball 🙌#TeamIndia will resume Day 3 with a lead of 171 runs in the second innings 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/X85JZGt0EV#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/c3mVHem1Ty
— BCCI (@BCCI) February 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)