IND vs SL 2nd T20: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या दुखापतीमुळे यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या टी-20 सामन्यात झेल घेताना सॅमसनला गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो या मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळू शकणार नाही. त्याच्या जागी बीसीसीआयने पंजाबचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माचा (Jitesh Sharma) त्याच्या जागी संघात समावेश केला आहे. सॅमसन दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे जिथे टीम इंडियाला फटका बसू शकतो, तिथे राहुल त्रिपाठीची (Rahul Tripathi) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची प्रतीक्षाही संपुष्टात येऊ शकते. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा उजव्या हाताचा स्टार फलंदाज पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात प्रथमच प्लेइंग इलेव्हनचा भाग होण्याची शक्यता आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)