भारतीय संघाचा माजी महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) जगभरात लाखो चाहते आहेत. सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना आजही त्याला मैदानावर क्रिकेट खेळताना पाहायचे आहे. चाहत्यांची ही इच्छा गुरुवारी पूर्ण झाली जेव्हा सचिन तेंडुलकर OWOF कप 2024 मध्ये खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यात वन वर्ल्ड टीमची कमानही सचिन तेंडुलकरच्या हाती होती. सचिन तेंडुलकरच्या संघाला भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) वन फॅमिली संघाचे आव्हान होते. या सामन्यात युवराज सिंगच्या टीम वन फॅमिलीने प्रथम फलंदाजी करताना सचिनच्या टीम वन वर्ल्डसमोर विजयासाठी 20 षटकांत 181 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी सचिन तेंडुलकरला बर्‍याच दिवसांनी पहिल्यांदा गोलंदाजी करताना पाहिले. खूप दिवसांनी चाहत्यांना हे दृश्य पाहायला मिळाले.सर्वांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. (हे देखील वाचा: Will Jacks Century: आरसीबीचा युवा फलंदाज विल जॅकने SA20 मध्ये उडवून दिली खळबळ, ठोकले धडाकेबाज शतक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)