Sachin Tendulkar Birthday: 24 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या ‘क्रिकेटचा देव’, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिनला पाहण्यासाठी, त्याला एकदा भेटण्यासाठी क्रिकेट चाहते वेडे होतात. त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) तरुणांना जेव्हा पहिल्यांदा सचिनला भेटण्याची संधी मिळाली, तेव्हा या स्टार्ससाठी ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. मुंबईने सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या युवा खेळाडूंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये या खेळाडूंनी मास्टर ब्लास्टर सोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीची कहाणी सांगितली.
"He inspired all of 🇮🇳 to watch cricket." 💙
The boys wish & share their experience of meeting 𝗦𝗮𝗰𝗵𝗶𝗻 for the first time on his special day 🥳 pic.twitter.com/JQ9wquIPZW
— Mumbai Indians (@mipaltan) April 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)