मुंबईने दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी राजस्थानकडून सलामीला यशस्वी जैस्वालसह इम्पॅक्ट प्लेअर सब्स्टीट्युट म्हणून जॉस बटलर उतरला. या दोघांनाही सुरुवातीपासूनच फटकेबाजी सुरू केली. त्यामुळे पॉवर-प्लेच्या 6 षटकात राजस्थानने एकही विकेट न गमावता 61 धावा केल्या. बटलर 18 चेंडूत 28 धावांवर नाबाद आहे. तसेच यशस्वी जयस्वालने 18 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आहेत. पॉवर-प्लेच्या 6 षटकांनंतर जयपूरमध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे या सामन्याला काही वेळासाठी थांबवावे लागले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)