दिवाळीच्या मुहूर्तावर टीम इंडिया आणि नेदरलँड्स (IND vs NED) यांच्यातील हा सामना बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. 2023 विश्वचषकाच्या (ICC World Cup 2023) साखळी टप्प्यातील हा शेवटचा सामना आहे. देशाला दिवाळी भेट देण्याच्या इराद्याने टीम इंडिया आज मैदानात उतरली आहे. यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबरला दोन उपांत्य फेरीचे सामने होतील. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला असुन न्यूझीलंडविरुद्ध भारताचा सामना 15 तारखेला मुंबईत होणार आहे. भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत, त्याचवेळी नेदरलँडचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलनंतर रोहित शर्मानेही अवघ्या 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. टीम इंडियाचा स्कोर 120/1.
Make that half-century number 💯 in international cricket for Rohit Sharma 👏👏
He powers #TeamIndia to yet another superb start!#CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/3tCVPUJ91K
— BCCI (@BCCI) November 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)