Rohit Sharma: एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माही अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला होता. अशा परिस्थितीत आता चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी येत आहे. पुढील कसोटी सामन्यात रोहित शर्मा संघात सामील होवु शकतो अशी माहिती मिळत आहे. संघासाठी सलामीच्या फलंदाजीतही रोहितला पर्याय म्हणून शुभमन गिलला खेळवले जात आहे. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित (Rohit Sharma) आगामी कसोटी सामन्यासाठी टीममध्ये परतताना दिसू शकतो. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध असेल आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे रोहित शर्माने संघ व्यवस्थापनाला सांगितले आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
Rohit Sharma has informed team management that he's available for the 2nd Test against Bangladesh. (Reported by Sports Tak).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)