Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team, Test Series 2024: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 19 सप्टेंबरपासून लाल चेंडूंच्या दोन सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी आज म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर ऋषभ पंतचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)