आयपीएल (IPL 2024) सुरू होण्यास अवघे तीन दिवस उरले आहेत. याआधी दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 19 मार्चच्या रात्री नवीन कर्णधाराची निवड केली आहे. आयपीएल 2023 च्या आधी दिल्लीचा पूर्णवेळ कर्णधार ऋषभ पंतचा अपघात झाला होता. या कारणामुळे तो आयपीएल 2023 खेळू शकला नाही. यावेळी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपद देण्यात आले. मात्र आता दिल्लीने पुन्हा एकदा कर्णधार बदलला आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपला नवा कर्णधार म्हणून ऋषभ पंतची (Rishabh Pant) निवड केली आहे.
पाहा पोस्ट -
COMEBACK DONE 👉🏼 NOW WELCOME BACK, CAPTAIN RISHABH PANT 💙❤️#YehHaiNayiDilli #IPL2024 pic.twitter.com/wN7xDgLW31
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)