टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळला गेला. पहिल्या कसोटीत टीम इंडियाने वेस्ट इंडिज संघाचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलचीही सुरुवात केली. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रवींद्र जडेजा डॉमिनिकाच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटताना दिसत आहे.
Number 1️⃣ Test all-rounder Ravindra Jadeja is enjoying his off-time.
📸: Ravindra Jadeja pic.twitter.com/5qT5f1DnsW
— CricTracker (@Cricketracker) July 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)