एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिज (WI) गाठून कॅरेबियन दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली, भारताने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता तिसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे बुधवारी म्हणजेच आज 27 जुलै रोजी होणार आहे. हा सामनाही जिंकून भारताला वेस्ट इंडिजचा मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे. तथापि, हवामान यात अडथळा ठरू शकतो, कारण तिसऱ्या वनडेदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तिसरी वनडे पावसात वाहून जाऊ शकते. यातच आता रवींद्र जडेजानंही (Ravindra Jadeja) आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)