Ranji Trophy 2022: भारताच्या अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) विजेत्या कर्णधार यश धुलने (Yash Dhull) आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवला आणि दिल्ली राज्य संघासाठी शतक झळकावले व आपल्या रणजी करंडक (Ranji Trophy) कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्याचा पहिला रेड-बॉल सामना खेळताना धुलने 133 चेंडूत शंभरी टप्पा गाठला. धुलने दिल्लीचा (Delhi) डाव सावरला आणि वरिष्ठ फलंदाज नितीश राणा सोबत तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 60 धावा जोडल्या. राणा बाद झाल्यावर धुलने धावफलक हलता ठेवला आणि आतापर्यंत जॉन्टी सिद्धूसह चौथ्या विकेटसाठी 100 पेक्षा अधिक धावा जोडल्या.
𝙒𝙝𝙖𝙩 𝘼 𝙈𝙤𝙢𝙚𝙣𝙩! 👌 👌
💯 on Ranji Trophy debut! 👏 👏
This has been a fantastic batting performance from Yash Dhull in his maiden First Class game. 👍 👍 @Paytm | #RanjiTrophy | #DELvTN | @YashDhull2002
Follow the match ▶️ https://t.co/ZIohzqOWKi pic.twitter.com/uaukVSHgUq
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)