Punjab Kings vs Rajasthan Royal: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 18 वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड (Maharaja Yadavindra Singh International Cricket Stadium, Mullanpur, Chandigarh) येथे खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने पंजाबचा 50 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने पंजाबसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबचा संघ 20 षटकात 9 गडी गमावून 155 धावा करु शकला. या मोठ्या विजयानंतर राजस्थान राॅयल्सने सातव्या स्थानी झेप घेतली आहे. तर पंजाबची पहिल्या स्थानावरुन चोथ्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच दिल्ली पहिल्या, बंगळुरु दुसऱ्या आणि गुजरात तिसऱ्या स्थानावर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)