इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 27 वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पंजाबमधील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्ससाठी आतापर्यंतचा हा मोसम चांगला गेला आहे. 5 पैकी 4 सामने जिंकून संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. पंजाब किंग्ज संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 2 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवासह पंजाब किंग्जची गुणतालिकेत आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 147 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून स्टार फलंदाज आशुतोष शर्माने सर्वाधिक 31 नाबाद धावांची खेळी खेळली. राजस्थान रॉयल्सकडून केशव महाराज आणि आवेश खान यांनी सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकात 148 धावा करायच्या आहेत.
पाहा पोस्ट -
Rajasthan Royals have restricted Punjab Kings to 148 runs.
An outstanding performance from RR bowlers👏#AshutoshSharma #KeshavMaharaj #AveshKhan #SanjuSamson #PBKSvRR #PBKSvsRR #IPL #IPL2024 #Cricket #SBM pic.twitter.com/Sel02OUMQO
— SBM Cricket (@Sbettingmarkets) April 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)