India Women National Cricket Team vs Pakistan Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup 2024 7th Match: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आज भारत आणि पाकिस्तानचे (IND vs PAK) महिला संघ आमनेसामने आले आहेत. या दोघांमधील सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. भारताची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व फातिमा सना करत आहे. भारताला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे तर पाकिस्तानने आपल्या मोहिमेची सुरवात विजयाने केली आहे. त्यामुळे सेमीफायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला आजचा सामना 'करो या मरो'चा आहे. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग

पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): मुनीबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, फातिमा सना (कर्णधार), तुबा हसन, नशरा संधू, सय्यदा आरूब शाह, सादिया इक्बाल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)