IND A Vs PAK A Score Update: भारताविरुद्ध पाकिस्तानचा संघ 205 धावांवर झाला गार, राजवर्धन हंगरगेकरने घेतले पाच बळी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 205 धावा केल्या. राजवर्धन हंगरगेकरने या सामन्यात दुसऱ्यांदा एकाच षटकात दोन विकेट घेत पाकिस्तानचा डाव 48 षटकांत संपवला. पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत.
इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत (Emerging Asia Cup 2023) आज भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होत (IND vs PAK) आहे. यश धुलच्या नेतृत्वाखाली युवा भारत अ संघाने सलग पाच सामने जिंकले असून सहावा सामना जिंकण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर पाकिस्तान अ संघ भारतावर मात करून सलग तिसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 205 धावा केल्या. राजवर्धन हंगरगेकरने या सामन्यात दुसऱ्यांदा एकाच षटकात दोन विकेट घेत पाकिस्तानचा डाव 48 षटकांत संपवला. पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत. हंगरगेकरने आपल्या आठव्या षटकात मोहम्मद वसीम ज्युनियरला प्रथम बाद केले. त्याने सात चेंडूंत आठ धावा केल्या. निकिन जोसने त्याचा झेल टिपला. यानंतर हुंगरगेकरने ध्रुव जुरेलकरवी डहाणीला झेलबाद केले. दहानीने चार धावा केल्या. डहाणी बाद झाल्यानंतर, हंगरगेकरने सामन्यात आपले पाच बळी पूर्ण केले आणि दोन षटके शिल्लक असताना पाकिस्तानला गुंडाळले.
Innings Break!
A fifer from Rajvardhan Hangargekar helps India 'A' restrict Pakistan 'A' to 205 👏🏻
Stay tuned for the chase!
Scorecard - https://t.co/6vxep2BpYw#ACCMensEmergingTeamsAsiaCup | #ACC pic.twitter.com/YQHAZquMIQ
— BCCI (@BCCI) July 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2023 05:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

