आशिया चषक 2022 च्या शेवटच्या साखळी टप्प्यातील सामन्यात हाँगकाँगविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना, मोहम्मद रिझवान आणि फखर जमान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने 20 षटकात 2 गडी गमावून 193 धावा केल्या. फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाला पहिला धक्का बाबर आझमच्या रूपाने बसला. बाबर आझम 9 धावा करून बाद झाला. यानंतर रिझवान आणि फखर जमानने डाव सांभाळला आहे. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 81 चेंडूत 116 धावांची भागीदारी झाली. फखर जमान 41 चेंडूत 53 धावा करून बाद झाला. मोहम्मद रिझवानने 57 चेंडूत 78 धावा केल्या. खुशदिलने 15 चेंडूत 35 धावांची दमदार खेळी खेळली. हाँगकाँगकडून एहसान खानने 2 बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)