T20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा (NZ vs PAK) 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह, पाकिस्तानचा संघ T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, जिथे त्यांचा सामना रविवारी इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. न्यूझीलंडने बुधवारी पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत चार बाद 152 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी डॅरिल मिशेलने 35 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या आणि कर्णधार केन विल्यमसनने 42 चेंडूत 46 धावा करत धावसंख्या 150 च्या पुढे नेली. प्रत्युत्तरात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पहिल्या विकेटसाठी 75 चेंडूत 105 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले.
WHAT A WIN, PAKISTAN! 🤯
Pakistan have reached their third Men's #T20WorldCup final 👏#NZvPAK pic.twitter.com/dumaIcWVeZ
— ICC (@ICC) November 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)