इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अॅशेस मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत 43 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सलग 100 वा सामना खेळत असलेला नॅथन लायन चर्चेचा विषय ठरतोय. त्याने या सामन्यात असं काहीतरी केलं आहे, ज्यामुळे त्याच्यावर चहुबाजुंनी कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. या सामन्यात फिल्डिंग करत असताना, त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.

या दुखापतीमुळे तो गोलंदाजी करू शकला नव्हता. मात्र संघ अडचणीत आहे, हे पाहून दुखापतग्रस्त असलेला नॅथन लायन स्वतःला आवरू शकला नव्हता. दुखापतग्रस्त असूनही तो फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)