Nathan Lyon Test Record: लॉर्ड्स कसोटीत नॅथन लिऑनने रचला मोठा इतिहास; 'या' महान विक्रमाला घातली गवसनी

या सामन्याद्वारे नॅथन लियॉन (Nathan Lyon) सलग 100 वा कसोटी सामना खेळत आहे. नॅथन लियॉन हा जगातील सहावा खेळाडू बनला आहे ज्याने सलग सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत.

Nathan Lyon Test Record: लॉर्ड्स कसोटीत नॅथन लिऑनने रचला मोठा इतिहास; 'या' महान विक्रमाला घातली गवसनी
Nathan Lyon (Photo Credit - Twitter)

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील अॅशेस 2023 मधील (Ashes 2023) दुसरी कसोटी लंडनमधील लॉर्ड्सवर खेळली जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज नॅथन लायनने एक खास कामगिरी आपल्या नावावर केली आहे. या सामन्याद्वारे नॅथन लियॉन (Nathan Lyon) सलग 100 वा कसोटी सामना खेळत आहे. नॅथन लियॉन हा जगातील सहावा खेळाडू बनला आहे ज्याने सलग सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. (हे देखील वाचा: Centuries in All Three Formats: कर्णधार म्हणून 'या' खेळाडूंनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये झळकावली आहेत शतके, यादीत एका भारतीय फलंदाजाचाही समावेश)

सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे खेळाडू

अॅलिस्टर कुक - 159

अॅलन बॉर्डर - 153

मार्क वॉ - 107

सुनील गावस्कर - 106

ब्रेंडन मॅक्युलम - 101

नॅथन लिऑन - 100*

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2023 07:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).