मोहम्मद शमी (Mohammad Shami) एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये फक्त सहावा सामना खेळत आहे. सेमीफायनल मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 4 विकेट घेत त्याने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याचे अजून चार षटके बाकी आहेत. त्याच्या पहिल्या दोन षटकांत त्याने संघाला पहिले दोन यश मिळवून दिले. त्यानंतर विल्यमसन आणि मिशेल क्रीझवर असताना तो आला आणि त्याने एकाच षटकात दोन बळी घेतले. त्याने वर्ल्डकपमध्ये 50 विकेट्सही पूर्ण केल्या. या विश्वचषकात सहाव्या सामन्यातच 20 विकेट घेणार्‍या मोहम्मद शमीने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. आता 50 विकेट घेणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तसेच, तो जगातील सर्वात जलद 50 विश्वचषक विकेट घेणारा खेळाडू बनला आहे. त्याने सर्वात कमी सामने आणि सर्वात कमी चेंडू अशा दोन्ही बाबतीत हा विक्रम आपल्या नावावर केला आणि ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे टाकले. (हे देखील वाचा: PM Modi Congratulates Virat Kohli: पीएम मोदींनी विराट कोहलीचे 50 वे वनडे शतक झळकावल्याबद्दल केले अभिनंदन, सांगितली मोठी गोष्ट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)