पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा हायवोल्टेज (High Voltage) सामना पार पडणार आहे. सुपर 4 चे सामने आता सुरु होणार असून रविवारी म्हणजेच 4 सप्टेबर रोजी भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) हा महामुकाबला रंगणार आहे.तरी पाकिस्तानचा मजबूत विकेट किपर मोहम्मद रिजवानने (Mohammad Rizwan) या सामन्यावर आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. मोहम्मद रिजवान म्हणाला भारता विरुध्दचा सामना कायम दबावपूर्ण सामना असतो. फक्त भारत आणि पाकिस्तान या दोन देशातचं नाही आशिया देशांच्या बाहेरील देशांना देखील या मॅचबाबत अधिक उत्सुकता असते म्हणून भारत विरुध्द पाकिस्तानची प्रत्येक मॅच ही फायनल मॅच असते, अशी प्रतिक्रीया मोहम्मद रिजवानने दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)