रोहित शर्मा हा क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. आता वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत (IND vs WI) रोहितने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 3500 धावा पूर्ण केल्या आहेत. भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाने पहिल्या डावात बिनबाद 146 धावा केल्या. यावेळी जैस्वालने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले, तर रोहित शर्माने कारकिर्दीतील 15 वे अर्धशतक झळकावले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीत 3500 धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यात यजमान संघ वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण संघ 150 धावांवर ऑलआऊट झाला. (हेही वाचा: Shreyas Iyer Health Update: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ॲक्शन मोडमध्ये दिसला श्रेयस अय्यर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)