आयपीएल 2024 स्पर्धेतील 64 वा सामना मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात होत आहे. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 208 धावा केल्या. प्रत्यूतरात लखनौला 20 षटकांत केवळ 189 धावा करता आल्याने त्यांचा 19 धावांनी पराभव झाला आहे. लखनौकडून निकोलस पूरन (61) आणि अर्शद खान (58) यांनी अर्धशतकीय पारी खेळत शेवटपर्यंत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. परंतू या दोघांना इतर खेळाडूंकडून हवी तशी साथ मिळाली नाही. दिल्लीकडून अनुभवी इशांत शर्माने सर्वाधिक 3 विकेट बाद केल्या. दरम्यान दिल्लीच्या या विजयाचा फायदा राजस्थानला झाला असून त्यांनी प्लेऑफच्या शर्यतीत बाजी मारली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)