LSG vs PBKS,IPL 2024 11th Match: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) आज पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स (PBKS vs LSG) यांच्यात सामना रंगणार आहे. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्जने त्यांच्या 2 पैकी एक सामना जिंकला आहे, तर लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौ सुपर जायंट्स आयपीएल 2024 मध्ये केएल राहुलच्या नेतृत्वाखाली त्यांचा पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, लखनौने घरच्या मैदानावर पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
Match 11. Lucknow Super Giants Won the Toss & elected to bat https://t.co/HvctlP1bZb #TATAIPL #IPL2024 #LSGvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)