KKR vs RCB, IPL 2025 1st T20 Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 आजपासून सुरूवात झाली आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स क्रिकेट संघ (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट संघ (RCB) यांच्यात कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने 7 गडी राखून केकेआरचा पराभव केला आहे. दरम्यान, या सामन्यात, विराट कोहलीची क्रेझ शिगेला पोहोचली होती. एका फॅन्सने सुरक्षा रक्षकांचा ताबा चुकवून लाईव्ह सामन्यात मैदानावर आला आणि फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीच्या पाया पडला. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला मैदानाबाहेर काढले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की मैदानाच्या मध्यभागी ती व्यक्ती कोहलीजवळ कशी पोहोचली? सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)