RCB vs KKR, IPL 2024: आज, आयपीएल 2024 च्या 36 व्या (IPL 2024) सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (KKR vs RCB) यांच्यांत सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात केकेआरने आरसीबीचा एका धावेने पराभव केला आहे. तत्पुर्वी, आरसीबीने केकेआरविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजीला आलेल्या केकेआरने आरसीबीसमोर 223 धांवांचे लक्ष्य ठेवले होते. कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. आरसीबीसाठी यश दयाल आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ 20 षटकांत 221 धावांवरच मर्यादित राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विल जॅकने सर्वाधिक 55 धावांची खेळी खेळली. लकाटा नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक तीन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)