India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. याआधीचे तीन दिवस पावसामुळे वाया गेल. दरम्यान, चोथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकात आलेल्या जसप्रीत बुमराहने दुसऱ्या चेंडूवर मुशफिकर रहीमला क्लीन बोल्ड करून भारताला चौथे यश मिळवून दिले. मुशफिकुरला चेंडू सोडायचा होता, पण चेंडू आतल्या बाजूने फिरला आणि ऑफ स्टंपला लागला. मुशफिकर 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
BOOM! 💥@Jaspritbumrah93 strikes early on Day 4 with a splendid delivery that comes back in sharply! 👏👏
Mushfiqur Rahim departs for 11.
Live - https://t.co/JBVX2gyyPf#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Dc4qdmt3M2
— BCCI (@BCCI) September 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)