वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 212 धावांनी पराभव करत डब्ल्युटीसी च्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले. टीम इंडियाच्या पराभवानंतर माजी अनुभवी अष्टपैलू इरफान पठाणचे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर इरफान पठाणने (Irfan Pathan) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक ट्विट केले आहे. इरफान पठाणने ट्विट करत पाकिस्तानी चाहत्यांवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये इरफान पठाणने लिहिले आहे की, माझ्या टाइमलाइनवर अचानक शेजाऱ्यांचा पूर आला. यासोबत पठाणने पुढे लिहिले आहे की, हे लोक खूप आनंदी आहेत कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)