CSK vs KKR, IPL 2024 22th Match: आयपीएल 2024 च्या 22 व्या सामन्यात (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून पराभव (CSK Beat KKR) केला. चेपॉकमध्ये झालेल्या या सामन्यात केकेआर संघ प्रथम खेळून केवळ 137 धावा करू शकला. प्रत्युत्तरात चेन्नईने 17.4 षटकांत केवळ तीन विकेट्स गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. चेन्नईसाठी, प्रथम रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी तीन बळी घेत चेंडूवर कहर केला आणि त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने फलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी केली. गायकवाडने 58 चेंडूत नाबाद 67 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. तर शिवम दुबेने 18 चेंडूत 28 धावा केल्या. चेन्नईचा या मोसमातील हा तिसरा विजय आहे, तर केकेआरचा पहिला पराभव आहे. चन्नईच्या या विजयानंतर त्यांनी चौथ्या स्थानी झेप घेतली आहे तर केकेआर दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)