आयपीएल 2024 च्या 17 व्या पर्वाची तारीख समोर आली आहे. लीगचे अध्यक्ष अरुण धुमळ यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. यावेळी देशात लोकसभा निवडणुकाही होणार आहेत. हे लक्षात घेऊन ही तारीख जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आयपीएल 2024 चा हंगाम फक्त भारतातच खेळला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी 2009 आणि 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे परदेशात आयोजन करण्यात आले होते.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)