IPL 2022, MI vs RR Match 9: जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत 8 विकेट जमवून 193 धावा केल्या मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 194 धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले. बटलर आणि हेटमायर यांनी आक्रमक फलंदाजी करून मुंबई इंडियन्स गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. बटलरने 100 धावांची वादळी खेळी केली तर हेटमायरने 14 चेंडूत 35 धावांचे छोटेखानी योगदान दिले. दुसरीकडे, मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्स यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)