IPL 2022, MI vs RR: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात आयपीएलचा 44 वा सामना नवी मुंबईच्या डॉ. DY पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबई पहिल्या विजयाच्या हेतूने मैदानात उतरेल तर राजस्थानने लक्ष्य प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे असेल. आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नाणेफेकीचा कौल लागला आणि त्याने राजस्थानला पहिले फलंदाजीला बोलावले. मुंबईकडून आजच्या सामन्यातून कुमार कार्तिकेय सिंहने (Kumar Kartikey Singh) पदार्पण केले असून संघ एकूण दोन बदलांसह मैदानात उतरणार आहे. टिम डेविड (Tim David) संघात परतला आहे तर डेवाल्ड ब्रेविस आणि जयदेव उनाडकटला बाहेर बसवले आहे.
Match 44. Mumbai Indians won the toss and elected to field. https://t.co/7GdkGvvdcz #RRvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)