IPL 2022, MI vs CSK Match 33: सीएसकेविरुद्ध (CSK) नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) निर्धारित षटकांत सात बाद 155 धावांपर्यंत मजल मारली आहे. अशाप्रकारे चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजयासाठी 156 धावांचे माफक टार्गेट मिळाले आहे. मुंबईच्या फलंदाजांची हाराकिरी या सामन्यातही सुरूच राहिली, पण तिलक वर्माच्या (Tilak Varma) दमदार अर्धशतकी खेळीने त्यांची लाज वाचवली. तिलक नाबाद 51 धावांची खेळी करून परतला. याशिवाय सूर्यकुमार यादवने 32 आणि हृतिक शोकीनने 25 धावांचे छोटेखानी योगदान दिले. तसेच जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) 19 धावा करून नाबाद राहिला. दुसरीकडे, मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) आणि ड्वेन ब्रावो यांनी बॉलने कहरच केला. मुकेशने सर्वाधिक तीन तर ब्रावोने दोन विकेट घेतल्या.
Tilak's grit & Unadkat's resilience at the end has taken us to a fighting total.
Time now to give it our absolute best with the ball 👊#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvCSK pic.twitter.com/O5FM3cFISn
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)