IPL 2022 CSK vs MI Match 59: आयपीएल (IPL) 2022 च्या 59 व्या सामन्यात पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जशी (Chennai Super Kings) होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धोनीचे ‘सुपर किंग्स’ पहिले फलंदाजीला उतरतील. सीएसकेसाठी ‘करो या मरो’चा सामना असून मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या Tristan Stubbs ने आयपीएल पदार्पण केले असून, मुंबईने बर्थडे बॉय किरॉन पोलार्डला (Kieron Pollard) बाहेर बसवले आहे. तसेच मुरुगन अश्विनच्या जागी हृतिक शोकीन XI मध्ये परतला आहे.
Match 59. Mumbai Indians won the toss and elected to field. https://t.co/c5Cs6DqFJi #CSKvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
ट्रिस्टन स्टब्सचे आयपीएल पदार्पण
Congratulations to Tristan Stubbs as he makes his IPL debut 👏 👏#TATAIPL | #CSKvMI | @mipaltan pic.twitter.com/0m98PnIl2N
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)