Mohammed Siraj Back: टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज (IND vs WI) दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली आहे. या मालिकेत टीम इंडियाला 1-0 ने मालिका जिंकण्यात यश आले आहे. आता 27 जुलैपासून दोघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI Series) खेळली जाणार आहे. पण त्या आधी भारतीय संघातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा वेगवान आणि स्टार गोलंदांज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) वनडे मालिका खेळणार नाही आहे. आर अश्विन, अजिंक्य रहाणे, केएस भरत आणि नवदीप सैनी या उर्वरित कसोटी पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसह गोलंदाज माघारी परतला. कामाचा ताण लक्षात घेऊन बीसीसीआयने सिराजला वेस्ट इंडिज दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यातून विश्रांती दिली आहे. भारताने अद्याप त्याच्या बदली खेळाडूचे नाव घेतलेले नाही.
🚨 India have rested Mohammed Siraj from the ODI leg of the West Indies tour
The bowler flew back with the rest of the Test returnees in R Ashwin, Ajinkya Rahane, KS Bharat and Navdeep Saini 👉 https://t.co/lt5uMsYgbr #WIvIND pic.twitter.com/mdP8rn53D9
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)