भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) विवाहबंधनात अडकला आहे. मुकेशने गेल्या मंगळवारी (28 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातून लग्नासाठी सुट्टी घेतली होती. आता तो लग्नाच्या बंधनात बांधला गेला आहेत. भारतीय वेगवान गोलंदाजाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लग्नाच्या फोटोमध्ये मुकेश आणि त्याची पत्नी अप्रतिम दिसत आहेत. आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने मुकेश कुमारचे अभिनंदन करताना लग्नाचा फोटो शेअर केला आहे. मुकेशच्या पत्नीचे नाव दिव्या आहे. गोपालगंज येथील मुकेशचे लग्न गोरखपूरमध्ये झाले. मुकेश कुमार हा ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध खेळल्‍या जाणा-या पाच सामन्याच्‍या टी-20 मालिकेचा भाग आहे, परंतु त्‍याने तिसर्‍या टी-20 मध्‍ये लग्‍नासाठी बीसीसीआयकडे रजा मागितली होती. याआधी खेळलेल्या दोन्ही टी-20 सामन्यांमध्ये तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. रायपूर येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या टी-20 मध्ये मुकेश टीम इंडियात सामील होणार आहे. (हे देखील वाचा: Rahul Dravid As Head Coach: राहुल द्रविड यांना टीम इंडिया प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ; BCCI चा निर्णय)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)