भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सलामीवीर रुतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. T-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद 4,000 धावा पूर्ण करणारा तो फलंदाज ठरला आहे. त्याने केएल राहुलचा विक्रम मोडला आहे, ज्याने 117 डावात ही कामगिरी केली होती. गायकवाडने कांगारू संघाविरुद्ध 116 डावात 7 धावा करत हा विक्रम केला आहे. या 116 डावांपैकी ऋतुराजने आयपीएल आणि इतर देशांतर्गत टूर्नामेंट सामन्यांमध्ये 100 डाव खेळले आहेत, तर त्याच्या 16 डाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहेत. T-20 क्रिकेटमध्ये जगातील सर्वात जलद 4,000 धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने केवळ 107 डावात 4 हजार धावा केल्या होत्या. त्याने हा विक्रम 2012 मध्ये केला होता व 11 वर्षांनंतरही हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. टी-20 क्रिकेटमध्ये चार हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज देखील आहे. (हेही वाचा: Ajinkya Rahane आणि Cheteshwar Pujara ची कसोटी कारकीर्द अडचणीत, निवडकर्त्यांनी दिले मोठे संकेत)

Ruturaj Gaikwad Becomes Fastest Indian to Score 4000 T20 Run- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)