विराट कोहलीच्या 71व्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या बळावर भारताने आशिया कप 2022 च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानसमोर 213 धावांचे लक्ष्य दिले आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून दिली. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. केएल राहुल 41 चेंडूत 62 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राहुलचे या स्पर्धेतील हे पहिलेच अर्धशतक आहे. यानंतर क्रिजवर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला, पण पुढच्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. अफगाणिस्तानकडून फरीद अहमदने दोन बळी घेतले. विराट कोहलीने शतक झळकावले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)