Australia Women's National Cricket Team vs Indian Women's National Cricket Team: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. आजपासून ही मालिका सुरू झाली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना ॲलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. हरमनप्रीत ब्रिगेडचा ऑस्ट्रेलियातील विक्रम सुधारण्यावर लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने आतापर्यंत 16 पैकी फक्त चार एकदिवसीय सामने जिंकले आहेत. भारताला 2021 मध्ये शेवटच्या वेळी येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाची कमान अष्टपैलू ताहलिया मॅकग्राकडे आहे. दरम्यान, भारताने फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 101 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
1ST WODI. WICKET! 34.2: Priya Mishra 0(6) b Megan Schutt, India (Women) 100 all out https://t.co/RGxrsRZRGN #AUSvIND
— BCCI Women (@BCCIWomen) December 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)