आज भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला आहे. 358 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकात केवळ 55 धावांवरच मर्यादित राहिला. या पराभवासह श्रीलंका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा भारतीय संघ पहिला संघ ठरला आहे. भारतीय संघाने गुरुवारी (2 नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा पराभव करून ही कामगिरी केली. भारतीय संघ आतापर्यंतचे सर्व 7 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारताच्या या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अजिंक्य आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले! श्रीलंकेविरुद्धच्या शानदार विजयाबद्दल संघाचे अभिनंदन! हे विलक्षण सांघिक कार्य आणि दृढतेचे चमकदार प्रदर्शन होते. (हे देखील वाचा: Mohammad Shami Record: मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये केला मोठा पराक्रम, बनला टीम इंडियाचा नंबर 1 गोलंदाज)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)