ICC Women's T20 World Cup 2024: पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकाच्या भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या एलॉइस शेरीडन आणि दक्षिण आफ्रिकेच्या लॉरेन एजेनबॅग यांची मैदानी पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर 6 ऑक्टोबर रोजी खेळल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्याची दूरचित्रवाणी पंच म्हणून वेस्ट इंडिजची जॅकलिन विल्यम्स काम पाहणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सामना अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. या विश्वचषकासाठी सर्व सामने अधिकारी महिला आहेत. त्यात तीन रेफरी आणि 10 पंचांचा समावेश आहे. भारताकडून जीएस लक्ष्मी मॅच रेफरी असतील, तर वृंदा राठी अंपायरिंगच्या भूमिकेत असतील.
The experienced pair of Claire Polosak and Lauren Agenbag will be the on-field umpires for the Women's #T20WorldCup opener 👏
More about the officials who will officiate key group game encounters ⬇https://t.co/DmRqG3NlIT
— ICC (@ICC) September 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)