IND W vs SA W 2nd ODI: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ (IND W vs SA W) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज बेंगळुरू येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा चार धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेवरही कब्जा केला आहे. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत तीन गडी गमावून 325 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर स्मृती मानधना हिने 136 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको म्लाबाने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 50 षटकांत 6 गडी गमावून 321 धावाच करू शकला. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार लॉरा वोल्वार्डने 135 नाबाद धावांची स्फोटक खेळी खेळली. टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝙁𝙄𝙉𝙄𝙎𝙃! 👌 👌
Absolute thriller in Bengaluru! 🔥@Vastrakarp25 & #TeamIndia hold their nerve to overcome the spirited South African side to take an unassailable lead in the ODI series! 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/j8UQuA5BhS
#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/aIV3CkthU5
— BCCI Women (@BCCIWomen) June 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)