आज टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा पाचवा रोमांचक सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत विश्वचषकाची विजयी सुरुवात केली. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला 49.3 षटकांत केवळ 199 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाने अवघ्या 41.2 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी केएल राहुलने नाबाद 97 धावांची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक तीन बळी घेतले. टीम इंडियाचा पुढचा सामना बुधवारी म्हणजेच 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानशी होणार आहे.
KL Rahul finishes off the chase with a MAXIMUM! 😎
He remains unbeaten on 97* & #TeamIndia start #CWC23 with a superb win against Australia 🙌
Scorecard ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/rZRXGei1QN
— BCCI (@BCCI) October 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)