IND-Women vs SA-Women 3rd T20I: दक्षिण आफ्रिका (South Africa) महिला संघाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20 भारतीय संघाने (Indian Team) बाजी मारली आणि मालिकेत पहिला व अखेरचा विजय मिळवला. अशाप्रकारे तीन सामन्यांची टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाने 2-1 असा विजय मिळवला. भारताकडून शेफाली वर्माने 30 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 60 धावा केल्या आणि स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) नाबाद 48 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिका संघ 20 ओव्हर 112 धावांवर ढेर झाली प्रत्युत्तरात भारतीय संघाने 11 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 114 धावा करत लक्ष्य गाठले. आफ्रिकी संघाकडून कर्णधार सुने लुसने 28 तर लारा गुडॉलने 25 धावांचे योगदान दिले. फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडने 4 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा दिल्या 3 विकेट काढल्या. शेफाली वर्मा सामनावीर ठरली तर, राजेश्वरी गायकवाडला प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार मिळाला.
#TeamIndia 🇮🇳 may have lost the series but have ended it on a high after a win in the final T20I 😎👌🏻
Well played & lot of confidence to take from a 🔝win @Paytm #INDWvSAW
Scorecard 👉 https://t.co/TMhte1veQD pic.twitter.com/2sNIauwpBW
— BCCI Women (@BCCIWomen) March 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)