पदार्पणवीर शेफाली वर्मा (Shafali Verma) आणि अनुभवी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांची पहिल्या विकेटसाठी रेकॉर्ड-ब्रेक भागीदारी व्यर्थ गेली. ब्रिस्टल येथे इंग्लंड महिला (England Women) संघाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात मिताली राजची टीम इंडिया (Team India) 231 धावांवर ढेर झाली आहे. टीम इंडिया अद्याप 165 धावांनी  आहे त्यामुळे यजमान ब्रिटिश संघाने फॉलोऑन दिला आहे. शेफाली आणि स्मृतीच्या चांगल्या सुरुवातीचा भारतीय संघ फायदा करून घेऊ शकला नाही. शेफालीने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात दमदार खेळी करत 96 धावा ठोकल्या तर स्मृतीने 78 धावांची कामगिरी बजावली. तसेच दीप्ती शर्मा 29 धावा करून नाबाद राहिली.  दुसरीकडे, इंग्लंडसाठी सोफी इक्लेस्टोनने  (Sophie Ecclestone) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)